चढाओढ..🔴
धार्मिक सत्ता प्रबळ व्हावी ही समाजातील किंबहुना प्रत्येक धार्मिक आणि जागरूक इसमाची ईच्छा असते.आणि प्रत्येक जण आपापल्या परीने त्यासाठी प्रयत्न करीत असतो.मात्र आता वेळ अशी आली आहे की,कर्मकांड हे लोकांना थोतांड वाटतं आहे,आणि ज्ञान कांड हे शक्तिस्थान!
भारतीय आणि हिंदू संस्कृती ही कर्मकांड पुरस्कृत करत आलेली आहे,आणि त्यामुळे आधी संस्कृती ला जाणून न घेता सरळ सरळ आपलाच अज्ञानी पणा पाझाळणे म्हणजे पोहता आपल्याला येत नाही आणि दोष पाण्याला देणे असं झालंय.
खरं तर आपलं हे अहोभाग्य आहे की आपण या हिंदू संस्कृतीमध्ये जन्माला आलेलो आहोत. त्याचा अभिमान बाळगणे सोडून आपण त्यालाच दुषणे देत बसलो आहोत हे कुठेतरी थांबायला हवं..!
आजच्या काळामध्ये लोकांची मानसिकता अशी झाली आहे कि हे धर्माचं बाजारीकरण ब्राम्हण आणि ब्राह्मण फक्त याच समाजातील घटकांनी मांडलेलं आहे. तर मग आपण सुरुवात ही त्याच ब्राह्मणांच्या उत्पत्तीपासून करूयात!असं म्हटलं जातं की ऋग्वेदामध्ये असं वर्णन आहे की देवाच्या मुखारविंदातून ब्राम्हणांची उत्पत्ति झालेली आहे.आणि याच कारणामुळे त्यांच्या मुखातून दैवी स्तुती करून घेण्यासाठी आणि लोकांपर्यंत ज्ञान पोहोचवण्यासाठी ब्राह्मणांनी काम करावे असे मानण्यात आले. शेवटी हा सृष्टीकर्ता भगवान असल्याकारणाने त्याची स्तुती करणारे ब्राम्हण हे समाजातील उच्चवर्णीय असतील हे स्पष्ट झालं. आणि याच कारणामुळे त्यांना समाजामध्ये एक विशिष्ट असा आदर मिळू लागला जो आजतागायत समाजामध्ये कायम आहे. ब्राह्मण कुळामध्ये ऋषीमुनी, विचारवंत, शास्त्रज्ञ, योध्दे ही होऊन गेले. समाजाला घडविण्याचे काम ब्राह्मणांनी केलं. अर्थातच राजगादी ही क्षत्रिय आंकडे असली तरीही क्षत्रियांना ते ज्ञान प्राप्त करून देण्याचे काम हे मात्र त्या विशिष्ट राज्यातील ब्राह्मणांकडे तसेच राज गुरुंकडे होते. हे ब्राह्मण ,तेजोमय, स्वाभिमानी तसेच अधिष्ठित होते त्यामुळे त्यांना कोणत्याही राजकीय लोभाची किंवा मोहाची अपेक्षा नव्हती आणि याच ज्ञानमय ब्राह्मणांमुळे आज आपला हा भारत वर्षाचा इतिहास सर्व जगामध्ये एका विशिष्ट कारणामुळे ओळखला जातो.
पण असं मानलं जातं की कोणताच व्यक्ती असो वा समाज असो हा पूर्णपणे परिपूर्ण नसतो, त्यामुळेच या ब्राह्मण समाजामध्ये सुद्धा अनेक नालायक लोकसुद्धा होऊन गेलेत. माझ्या माहितीनुसार जगातील कोणताच धर्म ,जात, समाज ,पंथ असा नसेल की ज्या मध्ये असले नालायक लोक त्यांच्या समाजाला, जातीला, पंथाला कलंकित करतात, ते जन्माला आले नसतील. पण त्या बोटांवर मोजण्याइतक्या लोकांमुळे संपूर्ण समाज किंवा धर्म हा कलंकित होत नसतो.
ब्रम्हा ला जाणतो असा तो ब्राह्मण ! पण प्रत्येक जण नाही न करता आपल्या नावाप्रमाणेच कर्म, समाजाला एक खूप उज्ज्वल असा इतिहास लाभलेला आहे आणि या इतिहासाला गेल्या शे-दोनशे वर्षांमध्ये काही ब्राह्मण मुळेच जो कलंक लागलेला आहे, तो आता मात्र पुसण्याची वेळ आलेली आहे.
मी आजही ब्राम्हण म्हटलं की ते होऊन गेले थोर असे ऋषीमुनी, विचारवंत यांची प्रतिमा माझ्या डोळ्यासमोर आणतो. आजचे लोभानी मोहून गेलेले असे काही ब्राम्हण यांना पाहून मला कधीकधी लाज वाटते.मात्र धर्माला आधुनिक रूप देऊन, धर्मामध्ये आधुनिक विचार निर्माण करून देणारे आणि लोकांना जगात घडणाऱ्या घडामोडीं सोबत अद्ययावत ठेवणारे ब्राह्मणही या समाजात आज उपस्थित आहेत हे पाहून मला मात्र अभिमान वाटतो.कारण निसर्गाचा नियम आहे की बदल हा होणारच आणि त्या बदलानुसार माणसाने बदलणे हि मला अगदी योग्य वाटते. आज समाजाने या प्रकारच्या लोकांचं मार्गदर्शन घ्यावं जेणेकरून आपल्याला स्वतःचा आत्म विकास घडवून आणता येईल.दोन्ही प्रकारचे लोक समाजात उपस्थित आहेत आता यामध्ये आपल्याला जायचं कोणाकडे हे संपूर्णपणे आपल्याच हाती आहे.
धर्म की शाश्वत गोष्ट आहे ती कधीही न संपणारी जिला कोणताच अंत नाही, अशी ती अविनाशी आहे. होय ! निश्चितच धर्म आपल्याला कर्मकांड करण्यासाठी सांगतो, आणि ते करायला हवं ,या मुद्द्याच्या मी विरोधात नाही. मात्र हे करत असताना ब्राह्मणांनी समाजाची लूट करणं थांबवायला हवं. यज्ञ तसेच आपल्या हिंदू समाजामधील अनेक रितीरिवाज हे वैज्ञानिक दृष्टीने ही फायदेशीर ठरले आहेत. तो काळ होता त्या काळी हे ब्राह्मण धन किंवा कोणताही इतर लोभ सोडून फक्त आणि फक्त धर्माचीच कामे करायची त्यामुळे त्यांचे जीवन हे तेजोमय होतं.त्यामुळे बाजारीकरण आणि ब्राम्हण या दोन गोष्टी जर डोळ्यासमोर आल्या तर सर्वप्रथम मी विरोध हा आजच्या मंदिरांमधील पुजाऱ्यांना करीनच. धर्माच्या नावाखाली स्वतःचे खिसे भरणे हे किती निंदनीय काम आहे ,याची जाणीव जर त्यांना असेल तर त्यांनी हे काम कधीच बंद केलं असतं. मात्र दुर्दैवाने त्यांना ती नाही.त्यामुळे मी सरळ सरळ सांगतो की जर तुम्हाला धर्माचं आचरण करायचं असेल, तुम्हाला धार्मिक विधी पार पाडायचे असतील तर समाजातील संन्यासी तसेच सर्व भोगांपासून दूर असलेल्या अशा ब्राह्मणांकडून पार पडायला हव्यात . कारण की फक्त याज्ञिकी चे व्यावहारिक शिक्षण घेऊन मंदिरात पुजारी असलेले लोक हे त्या दैवी कार्याचे पुनरुत्थान करण्यासाठी अपात्र आहेत. दुसरी गोष्ट अशी मंदिरामध्ये दान करण्याऐवजी एखाद्या अनाथ आश्रम - बाल आश्रम मध्ये दान केले कितीही चांगलं..! दुर्दैव आहे आजच्या या ब्राह्मण पिढीचं की मंदिरामध्ये बहुसंख्य पुजारी ब्राह्मण हे फक्त आणि फक्त धन लोभापायी जातात.ज्यांचं जीवन हे निर्विकार असायला हवं ,त्यांचं जीवन हे विकारी घडत जातं ते फक्त या धनाच्या लोभापायी..! आज आपल्यासमोर हे एक आव्हान आहे की आपल्या या समाजावर असलेला हा कलंक धुऊन काढीत,आपण पहिले स्वतः आपल्या धर्माला जाणून घेणे - आणि त्याचं योग्य तऱ्हेने ज्ञान हे समाजामध्ये वाटणं ! हीच आपली आजची पहिली जबाबदारी आहे.😑🧡
- सौरभ कुलकर्णी,
संभाजीनगर - ४३१०१
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा