उपवास करताय का उपहास..??
उपवास -खरा अर्थ काय ? भारतीय आणि उपवास यांचे नाते आपण चांगलेच जाणून आहोत ,त्यातही इतर गोष्टींप्रमाणेच महाराष्ट्र यातही आघाडीवर आहे .अनेक देवदेवता ,त्यांची नवरात्रे ,शिवाय रामनवमी,हनुमानजयंती,जन्माष्टमी,गणेशजयंती असे अनेक उपास,याखेरीज महाशिवरात्र,आषाढी आणि कार्तिकी एकादशी ,मासिक नियमित उपासंमध्ये चतुर्थी ,दोन एकादश्या ,प्रदोष आणि शिवाय साप्ताहिक ज्याचा त्याचा सोमवार ते रविवार असा कोणताही वार ,अशी ही न संपणारी जंत्री आहे . बर उपास का करता असं विचारलं तर त्याचं पटेल असं उत्तर कोणालाही सांगता येत नाही .आमच्या घरची पद्धत आहे ,लहानपणापासून करत आलो आहोत ,अहो देवाचं असं मधेच सोडता येतं का अशी उत्तरं मी अनेक वर्षं लोकांकडून ऐकत आलो आहे . उपवास म्हणजे जवळ बसणे म्हणजे काय तर शरीराची ,खाण्याची चिंता सोडून सगळे तनमन देवाशी एकाग्र करून देवाच्या जवळ बसणे .आपल्यापैकी किती जण असा उपवास करतात सांगा पाहू? उलट भजन ,कीर्तन करून येणाऱ्या बायकांची चर्चा ऐकली तर हसू येते .चला ,जाताजाता मला केळी,खजूर आणि राजगिरा लाडू घ्यायचे आहेत ,घरी जाऊन खिचडी परतायची आहे असे संवाद ऐकू येतात .काही विशेष उपव...